Friday, February 11, 2011

॥ ॐ नमः शिवाय ॥


दिनांक २ मार्च २०११ रोजी महाशिवरात्र आहे. सदगुरु श्री अनिरुद्ध बापुंनी महाशिवरात्र, रात्रीची उपासना, नंदिपक्ष व वालुकेश्वराचे महत्व प्रवचनातुन सांगितले आहेत.

नंदिपक्ष - महाशिवरात्रिच्या आधीच्या आठवडयातील गुरुवारपासुन, महाशिवरात्रिच्या नंतरच्या गुरुवारपर्यंतच्या कालावधीला "नंदिपक्ष" किंवा "नंदि पंधरवडा" म्हणतात.
या नंदिपक्षात श्रद्धावान श्री हरिगुरुग्राम येथे परमशिवाच्या ’सिद्धवालुकेश्वराच्या शिवलिंगासमोर शिवपंचाक्षरी स्तोत्राचे पठण करतात आणि शेवटच्या गुरुवारी शिवलिंगास बेलपत्र अर्पण करतात.

नंदिपक्षात या शिवपंचाक्षरी स्तोत्राचे केलेले पठण, मानवातील सर्व परस्परविरोधी शक्तींना परस्परपूरक बनवून त्या द्वारे मानवाचा जीवनविकास करणारे आहे. नंदि ऋषींनी रचलेल्या या स्तोत्रात "नमः शिवाय" हा पंचाक्षरी मंत्र आहे. त्यामुळे या स्तोत्राच्या अकरा वेळा केलेल्या पठणाने "ॐ नमः शिवाय" हा मंत्र मनाच्या पुर्ण एकाग्रतेने म्हटल्याचे पुण्य मिळते.

तसेच सर्व श्रद्धावानांनी महाशिवरात्रिच्यादिवशी श्री गुरुक्षेत्रम येथे त्रिविक्रमासमोर बेलपत्र अर्पण करावे. हा परमशिवच त्रिपुरारि त्रिविक्रम बनुन या गुरुक्षेत्रम येथे भक्ताच्या हाकेला साद देण्यास उभा आहे.

Note : For more information refer to Kripasindhu - January 2011

Monday, February 7, 2011


 ॐ कार व्यापका अनिरुद्धनाथा

               सदगुरु श्री अनिरुद्धांनी श्रद्धावानांना नव अंकुर ऐश्वर्य प्राप्त व्हावीत व त्यासाठी देहातील आठ क्षेत्रे उचितपणे कार्यरत रहावीत म्हणून माघी गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे .
              माघी गणपती उत्सवात  ब्रम्हणस्पतीच्या मूर्तीचे  दर्शन घेण्याचा लाभ मिळतो . ह्या काळात  ब्रम्हणस्पतीच्या मूर्तीवर ब्रम्हणस्पती सूक्ताच्या पठणाद्वारे अभिषेक केला जातो. हे सुक्त ऋग्वेदातील अत्यंत पवित्र सुक्त आहे. केवळ व्यक्ती वा समाजाचेच नाही तर अवघ्या राष्ट्राचे भले करणारे आहे. राष्ट्राला, प्रत्येक नागरिकाला समर्थ आणि निर्भय करणारे असे हे सुक्त आहे.  ह्या उत्सवात अष्टविनायकांचे पूजन देखील केले जाते.

            या गणपती उत्सवात तसेच दर मंगळवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सदगुरू श्री अनिरुद्धांच्या आज्ञेने श्रद्धावान खालील मंत्राचा त्या त्या दिवसास ७२ वेळा जप करतात.   


|| ॐ श्री ब्रह्मणस्पतये पार्वतीपुत्राय मंगलमुर्तये गणपतये विश्व घनप्राणाय सर्व विघ्न निवारकाय नमो नम: ||


माघी गणपती उत्सवामध्ये सहभागी होऊन गणेश दर्शनाचा लाभ आपण सगळे घेउया. .

उत्सवाचे ठिकाण व वेळ :उत्तर भारतीय संघ हॉल, टीचर्स कॉलनी , बांद्रा (पू) मुंबई -५१ . 
                                 सकाळी १० ते रात्री ९ वाजे पर्यंत 



Sunday, December 12, 2010

श्री वरद चन्डिका प्रसन्न उत्सव - कंठकुप पाषाण पुजन




परमपुज्य सदगुरु अनिरुद्ध बापुंनी दिनांक २१-१०-२०१० रोजी केलेल्या प्रवचनात "श्री वरद चन्डिका प्रसन्न उत्सवाबद्द्ल" महिती सागितली. या उत्सवात "महासरस्वती वापी (विहीर)" असेल. हि विहीर ७२० कंठकुप पाषणापासुन बनवली जाईल.
हे कंठकुप पाषाण दिनांक ६-१२-२०१०, ०७-१२-२०१०, ०८-१२-२०१० म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार या दिवशी श्री क्षेत्र गुरुकुल जुइनगर येथे सिध्द केले जातील. 
गुरुवार दिनांक १६-१२-२०१० रोजी स्वतः परमपुज्य बापु, परमपुज्य नंदाई व परमपुज्य सुचितदादा या  कंठकुप पाषाणाचे पुजन श्री हरिगुरुग्राम येथे करणार आहेत. बापुंनी सांगितले आहे कि हे पुजन करताना तुम्ही "श्री देवीमाता" बनवणार आहात. पण कसे ते आता सांगणार नाहि. 
आपण सर्वजण गुरुवार दिनांक १६-१२-२०१० रोजी या कंठकुप पाषाणाच्या पुजनात सहभागी होउया. आणि पाहुया आपल्या लाडक्या बापु, आई, दादांना "श्री देवीमाता" बनवताना............

॥ ॐ नमःश्चंडिकाये ॥

Sunday, November 28, 2010

सचिदानंद उत्सव

तुझ्या चरणांची धुळ हेची अमुचे गोत्र कुळ
चरणांच्या सेवेसाठी मनालागे तळ्मळ

श्रीमद्पुरुषार्थ ग्रन्थराज आनंदसाधनामधील आचमन ५० मधे सांगितले आहे कि "पुरुष व स्त्रियांनी हनुमंत व भरताप्रमाणे व्हावे. हेच एकमेव ध्येय भगवंताचे सामिप्य देते." हनुमंत व भरत या दोघांनी हि सदुगुरुच्या चरणांना आपल्या जिवनात अनन्य स्थान दिले आहे. आणि म्हणुन हेच ध्येयसमोर ठेउन वाटचाल करताना आपल्या सर्वांसमोर ठाकला आहे "सचिदानंद उत्सव"
मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा शनिवार म्हणजे दिनांक १८-१२-२०१० पासुन सचिदानंद उत्सवास सुरुवात होत आहे. भक्तगण सदुगुरुच्या पादुकांचे पुजन दिड दिवस म्हणजेच १८-१२-२०१० ते १९-१२-२०१० किंवा पाच दिवस म्हणजेच १८-१२-२०१० ते २२-१२-२०१० करु शकतात. पादुकांची नोंदणी श्रीहरिगुरुग्राम व उपासनास्थळी करु शकतात.पादुका नोंदणीची शेवटची तारीख श्रीहरिगुरुग्राम येथे ०२-१२-२०१० व उपासनास्थळी ०४-१२-२०१० आहे.

Thursday, November 18, 2010



या विश्वाच्या भाग्याकरीता अनिरुद्ध आला


प्रत्येक बापु भक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघतो तो "सोनियाचा दिवस" काहि दिवसांवर येउन ठेपला आहे. आपल्या देवाचा वाढदिवस म्हणजेच "अनिरुद्ध पौर्णिमा", दिनांक २१ नोव्हेंबर २०१० रोजी मुलुंड - पुर्व येथे हा उत्सव साजरा केला जाईल याची सर्व भक्तानी नोंद घ्यावी.
उत्सवाचे ठिकाण व वेळ :  छत्रपती संभाजीराजे क्रिडांगण, नवघर रोड,
                                      मुलुंड जिमखानाच्या जवळ,   
                                      मुलुंड - पुर्व, मुबंई.
                                      (Eastern Express Highway जवळ)

उत्सवाची वेळ : दिनांक २१ नोव्हेंबर २०१० वेळ - सकाळी १०:०० ते रात्रो ९:००

अनिरुद्ध पोर्णिमा उत्सवामधील खास गोष्टी :-
१. परमपुज्य सदगुरु अनिरुद्ध बापुंचे दर्शन 
२. श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज वितरण
३. रामरक्षा पठण
४. विश्वरुप दर्शन - गार्हाणे व सुदिप अर्पण
५. उद अर्पण
६. तसेच सर्वाना "श्री वरद चन्डिका प्रसन्न उत्सवाबद्द्ल" माहिती पुरवण्यासाठी खास counter हि उपलब्ध असेल.

हे बापुराया ना तु गुरुपौर्णिमेला काहि घेतोस, ना तुझ्या वाढदिवशी म्हणजेच अनिरुद्ध पौर्णिमेला काहि घेतोस. तु फ़क्त देतच राहतोस "तुझ अनिरुद्धप्रेम".खरच असा देव, असा बाप, असा सखा ज्याच्या जवळ आहे अस तुझ प्रत्येक बाळ तुझ्याकडे एकच मागणं मागतो " जीवनी माझ्या बा अनिरुद्धा श्वासासंगे येत रहा"

Monday, November 1, 2010

शुभ दिपावली



दिवाळीचा सण म्हटला की डोळ्यासमोर येते ती,  दारात सजलेली रांगोळी आणि दिव्यांची माळ, घराच्या खिडकीत दिमाखात असलेला आकाशकंदील, खमंग फराळ आणि सुंगंधि उटण्याचे अभ्यग़ स्नान.....
आणि अश्या ह्या दिवाळीच स्वागत करूया आपल्या बाप्पाला स्मरून.

१) पाडव्याच्या दिवशी करायचे पूजन :-
पहाटेच्या वेळी पूर्ण घरातील केर काढून तो एका पुठयावर ठेवावा. त्यावर कणकेपासून बनवलेला दिवा (तूपाचा) प्रज्वलित करणे. या पुठयावर एक गोड पदार्थ ठेवणे. हे सर्व वस्तू संपूर्ण घरात फिरवणे. घरातील दुसर्‍या व्यक्तीने मागून ताट वाजवत फिरणे. घराबाहेर एका कोपर्‍यात घरातील जुनी झाडू ठेवावी व त्या बरोबर पुठयावरील वस्तू ठेवणे. नमस्कार करून म्हणावे " ईडा, पीडा टलो, बळीचे राज्ययेवो."

२) लक्ष्मीपूजन
प्रसाद - पाच फळे व धणे-गुळाचा नैवेध्य अर्पण करणे.
नवीन झाडू उंबरयावर ठेवणे. तिला हळद व कुंकू अर्पण करून नमस्कार करणे. नंतर खालील प्रार्थना करणे.
" हे लक्ष्मीमाते-नंदामाते, तू नेहमी माझ्या चुका दाखव. आईच्या मायेने माझ्या अंगावरून हात फिरव. बहिणीसारखे वाटेतील काटे काढ, पापणिच्या केसासारखा माझ्या मनातील व घरातील कचरा काढ.
आणि माझ्या घरात  नंदा माते तू सतत वावरत रहा ही तुझ्या चरणी प्रार्थना."

Sunday, October 10, 2010

नवरात्र पूजन 

नवरात्र उत्सव म्हणजे आपल्या आईचा उत्सव.अशुभनाशनासाठी ती अष्टादशभुजा बनून आलीच आहे आणि त्याच वेळी तिच्यावर व तिच्या पुत्रावर पूर्ण निष्ठा असणार्‍या त्याच्या लेकरांवर, ही आई तिच्या वात्सल्याची बरसात करण्यास आली आहे. आपले बापू-नंदाई-सूचितदादा जर या आईच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत तर आपण त्याची लेकर आपल्या आजीच्या उत्सवात का मागे पडायच? चला तर मग आपण सगळे हातात हात गुंफून त्या आदिमातेच्या आणि आपल्या बाप्पासमोर रास गरबा खेळूया. हो, पण रासगरबा खेळायचा तर घटस्थापना करायला हवी. चला तर आपल्या नंदाईला घरी बोलावूया.

घटस्थापना विधी :

अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना करावी. प्रथम जिथे घटस्थापना करणार ती जागा स्वच्छ पुसून घेणे. नंतर पाट किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र घालणे. त्यावर थोडे तांदूळ पसरंणे. एका कलाशात तांदूळ किंवा गहू पूर्ण भरणे व तो कलश चौरंगावर मांडणे. या कलशावर ताम्हण ठेवावे. त्यावर नंदाईचा फोटो ठेवणे.
दसर्‍यानंतर हा घट पूर्ण प्रेमाने हलवावा व आपल्या आईला प्रेमाने हाक मारावी. घटातले धान्य अन्नपूर्णा प्रसादम्ला अर्पण करावे.

ललिता पंचमी विधी :


या दिवशी सूर्योदायापुर्वी सदगुरूची प्रतिमा संपूर्ण घरात बाप्पाचा जप करत फिरवावा. नैवेध्य अर्पण करताना त्यात पुरण समाविष्ट करावे. (पुरण स्निग्ध गुणाने युक्त असण्यासाठी चण्याच्या डाळ ऐवजी मूग डाळ वापरावी.)

अष्टमी होम :
सायंकाळी ७:०० वाजता (वेळ मागे-पुढे झाली तरी हरकत नाही) सदगुरूच्या प्रतिमेसमोर अक्षता (तांदूळ+कुंकू) पसराव्यात. त्यावर ताम्हाणे ठेवावे. त्यात तांदूळ ठेवावे. त्यावर नउ कापूर (एक मधे व आठ वर्तुळात) ठेवावेत. नंतर अग्नी प्रज्वलित करावा.
प्रथम "सर्वमंगल मांगल्ये... " म्हणावे नंतर सदगुरूचा जप १०८ वेळा म्हणणे. हा विधी करताना एक कापूर
प्रज्वलित  ठेवला तरी चालेल.

चला, या नवरात्रीत बापूनी सागीतल्याप्रमाणे बुद्धीदाता गणरायाच्या आशिर्वादाने पितृ पक्षात आपल्या पूर्वजांच्या तसेच आपल्या पूर्वायुष्यातल्या चुकीच्या गोष्टींचे चिंतनं करू व त्या सर्व चुकीच्या गोष्टीना अशुभनाशिनिच्या चरणावर अर्पण करूया.