अहिल्या संघ
"स्त्रिजन्मा ही तुझी कहाणी ह्रदयी अमृत नयनी पाणी" - भारतीय स्त्री हे दुःखाचे मूर्तिमंत रुपक, आज आपल्या देशात शिकलेली असूनही स्त्रीला समाजात दुय्य्म स्थान आहे.अजुन हि स्त्रीवर खुप अत्याचार होत आहे, मग ती स्त्री घरात असो की घराबाहेर व अश्या वेळेस तिच्या मदतीला कोणीही येत नाहि.
या सर्वावर मात करण्यासाठी परमपुज्य नंदाईच्या मार्गदर्शनाखाली अहिल्या संघा तर्फे स्त्रीला आत्मनिर्भर आणि शारिरीक दृष्टया सबळ बनवण्य़ाचे कार्य अहिल्या संघ करते आहे. हि स्त्री मुक्ती चळवळ नाही कृपया ह्याची प्रत्येकाने नोंद घ्यावी. संकटकाळी कोणच्याही मदतीची वाट न बघता स्वत:चे संरक्षण स्वत: करता यावे यासाठी परमपुज्य बापुंनी सर्व स्त्रीयांसाठी ३ ऑक्टोबर रोजी प्राच्यविद्या खुल्या केल्या.
अहिल्या संघा तर्फे स्त्रीयांना ह्या विद्या शिकवल्या जातात. स्त्रीयांनी या प्राच्यविद्या शिकण्यासाठी अहिल्या संघात नोंदणी करणे आवश्यक आहे. इछुक स्त्रीयांनी नोंदणीस जाताना पासपोर्ट साईज दोन फोटो नेणे आवश्यक आहे.
नोंदणी करण्याचे ठिकाण
श्री हरिगुरुग्राम (गुरुवार)
न्यु इंग्लिश स्कुल, शासकिय वसाहत,
वान्द्रे - पुर्व
किंवा
अहिल्या संघ कार्यालय
लिंक अपार्टमेंट, ३ रा मजला
खार - पश्चिम
अहिल्या संघातर्फे राबविण्यात येणारे इतर उपक्रम :
वृक्षारोपण
वात्सल्याची उब योजना
या विषयावरची अधिक माहिती घेऊया लवकरच.