दिनांक २ मार्च २०११ रोजी महाशिवरात्र आहे. सदगुरु श्री अनिरुद्ध बापुंनी महाशिवरात्र, रात्रीची उपासना, नंदिपक्ष व वालुकेश्वराचे महत्व प्रवचनातुन सांगितले आहेत.
नंदिपक्ष - महाशिवरात्रिच्या आधीच्या आठवडयातील गुरुवारपासुन, महाशिवरात्रिच्या नंतरच्या गुरुवारपर्यंतच्या कालावधीला "नंदिपक्ष" किंवा "नंदि पंधरवडा" म्हणतात.
या नंदिपक्षात श्रद्धावान श्री हरिगुरुग्राम येथे परमशिवाच्या ’सिद्धवालुकेश्वराच्या शिवलिंगासमोर शिवपंचाक्षरी स्तोत्राचे पठण करतात आणि शेवटच्या गुरुवारी शिवलिंगास बेलपत्र अर्पण करतात.
नंदिपक्षात या शिवपंचाक्षरी स्तोत्राचे केलेले पठण, मानवातील सर्व परस्परविरोधी शक्तींना परस्परपूरक बनवून त्या द्वारे मानवाचा जीवनविकास करणारे आहे. नंदि ऋषींनी रचलेल्या या स्तोत्रात "नमः शिवाय" हा पंचाक्षरी मंत्र आहे. त्यामुळे या स्तोत्राच्या अकरा वेळा केलेल्या पठणाने "ॐ नमः शिवाय" हा मंत्र मनाच्या पुर्ण एकाग्रतेने म्हटल्याचे पुण्य मिळते.
तसेच सर्व श्रद्धावानांनी महाशिवरात्रिच्यादिवशी श्री गुरुक्षेत्रम येथे त्रिविक्रमासमोर बेलपत्र अर्पण करावे. हा परमशिवच त्रिपुरारि त्रिविक्रम बनुन या गुरुक्षेत्रम येथे भक्ताच्या हाकेला साद देण्यास उभा आहे.
Note : For more information refer to Kripasindhu - January 2011