Sunday, October 10, 2010

नवरात्र पूजन 

नवरात्र उत्सव म्हणजे आपल्या आईचा उत्सव.अशुभनाशनासाठी ती अष्टादशभुजा बनून आलीच आहे आणि त्याच वेळी तिच्यावर व तिच्या पुत्रावर पूर्ण निष्ठा असणार्‍या त्याच्या लेकरांवर, ही आई तिच्या वात्सल्याची बरसात करण्यास आली आहे. आपले बापू-नंदाई-सूचितदादा जर या आईच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत तर आपण त्याची लेकर आपल्या आजीच्या उत्सवात का मागे पडायच? चला तर मग आपण सगळे हातात हात गुंफून त्या आदिमातेच्या आणि आपल्या बाप्पासमोर रास गरबा खेळूया. हो, पण रासगरबा खेळायचा तर घटस्थापना करायला हवी. चला तर आपल्या नंदाईला घरी बोलावूया.

घटस्थापना विधी :

अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना करावी. प्रथम जिथे घटस्थापना करणार ती जागा स्वच्छ पुसून घेणे. नंतर पाट किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र घालणे. त्यावर थोडे तांदूळ पसरंणे. एका कलाशात तांदूळ किंवा गहू पूर्ण भरणे व तो कलश चौरंगावर मांडणे. या कलशावर ताम्हण ठेवावे. त्यावर नंदाईचा फोटो ठेवणे.
दसर्‍यानंतर हा घट पूर्ण प्रेमाने हलवावा व आपल्या आईला प्रेमाने हाक मारावी. घटातले धान्य अन्नपूर्णा प्रसादम्ला अर्पण करावे.

ललिता पंचमी विधी :


या दिवशी सूर्योदायापुर्वी सदगुरूची प्रतिमा संपूर्ण घरात बाप्पाचा जप करत फिरवावा. नैवेध्य अर्पण करताना त्यात पुरण समाविष्ट करावे. (पुरण स्निग्ध गुणाने युक्त असण्यासाठी चण्याच्या डाळ ऐवजी मूग डाळ वापरावी.)

अष्टमी होम :
सायंकाळी ७:०० वाजता (वेळ मागे-पुढे झाली तरी हरकत नाही) सदगुरूच्या प्रतिमेसमोर अक्षता (तांदूळ+कुंकू) पसराव्यात. त्यावर ताम्हाणे ठेवावे. त्यात तांदूळ ठेवावे. त्यावर नउ कापूर (एक मधे व आठ वर्तुळात) ठेवावेत. नंतर अग्नी प्रज्वलित करावा.
प्रथम "सर्वमंगल मांगल्ये... " म्हणावे नंतर सदगुरूचा जप १०८ वेळा म्हणणे. हा विधी करताना एक कापूर
प्रज्वलित  ठेवला तरी चालेल.

चला, या नवरात्रीत बापूनी सागीतल्याप्रमाणे बुद्धीदाता गणरायाच्या आशिर्वादाने पितृ पक्षात आपल्या पूर्वजांच्या तसेच आपल्या पूर्वायुष्यातल्या चुकीच्या गोष्टींचे चिंतनं करू व त्या सर्व चुकीच्या गोष्टीना अशुभनाशिनिच्या चरणावर अर्पण करूया.
अशुभनशिनि नवरात्र उत्सव



आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अशुभनशिनि नवरात्र उत्सव सुरू झाला आहे.

अशुभनशिनि नवरात्र उत्सवाचे महत्व :- (मातृवात्स्यल्यविंदानम ग्रंथ)
श्रीराम अवतारात आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी श्रीराम-लक्ष्मण-हनुमंत ह्यानी मिळून अशुभनाशिनी स्तवनाचे १०८ वेळा पठण करताच ती श्री रामवरदायिनि श्री रामांना विजय प्राप्ती चा आशीर्वाद देते. पंचमीच्या दिवशी काकरूपी असुर दुर्गमाचावध करते. आश्विन शुद्ध अष्टमी च्या सूर्यास्ता आधीच्या क्षणी रामांनी रावणाचा वध केला.
आश्विन शुद्ध नवमी च्या दिवशी  श्रीराम-जानकी-लक्ष्मण ह्यानी मिळून  महिषासूर मर्दिनीचे "श्रीवज्रमंडलपीठपूजन" केले. श्री रामवरदायिनि च्या अवतारामुळे व श्रीरामांनी केलेल्या पूजानामुळे आश्विन महिन्यात "अशुभनशिनि नवरात्र पूजन" चालू झाले.

परमपुज्य सदगुरू बापू यांनी प्रवचनात सांगितले आहे की या दिवसात जास्तीत जास्त पवित्र स्पंदन संपूर्ण विश्वात प्रॅसवली जातात. या वर्षीचा नवरात्र उत्सव हा अत्यंत महत्वाचा आहे कारण या सर्व दिवसात माता महिषासूर मर्दिनीची सर्व रूपे एकाच वेळी भक्त रक्षणासाठी म्हणजेच अशुभनाशनासाठी पूर्णपणे कार्यरत आहेत.तसेच परमपूज्य सदगुरू बापूनी गुरूक्षेत्रम् च्या दर्शनाचे महत्व वारंवार प्रवचनातून सांगितले आहेच. त्यामुळे या उत्सवात जास्तीत जास्त वेळा हया आदिमातेचे दर्शन घेणे ही सर्व भक्तांसाठी पर्वणीच आहे. ती माता महिषासूर मर्दिनीची फक्त मूर्ती नसून ती स्वतः आदिमाता हया गुरूक्षेत्रम् मध्ये प्रगटली आहे. या उत्सवात भक्त, चंडिका मातेला आपले प्रेम विविध स्वरुपात अर्पण करू शकतात.
- मातृवात्स्यल्यविंदानम ग्रंथाचे नवरात्री संहिता पठण
- राम चरित्राचे वचन, पठण. उदा. रामरसायन, सुंदरकांड
- श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् आणि श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् यांचे पठण
- आदिमातेची पॅंचोपचारे ऑटी भरणे
- पुष्प अर्पण करणे